बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोला मुलं नाही तर मुलींमध्ये इंटरेस्ट; घटस्फोट झाल्यानंतर केला मोठा खुलासा

सलमान खानच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा

Updated: Oct 1, 2022, 05:05 PM IST
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोला मुलं नाही तर मुलींमध्ये इंटरेस्ट; घटस्फोट झाल्यानंतर केला मोठा खुलासा  title=

मुंबई : अलीकडेच, सोहेल खानची एक्स पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहने त्यांच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे वक्तव्य केलं आणि आता सीमा सजदेहने एक धक्कादायक खुलासा केला आहे. Netflix चा शो 'Fabulous Lives of Bollywood Wives' च्या नवीन सीझनमध्ये त्याच्या एका एपिसोडमध्ये, मॅचमेकर सीमा टपरियाने गेस्टची भूमिका निभावली.

एपिसोडमध्ये सीमा टपरिया यांनी सीमा सजदेहला विचारलं की, तिचं 22 वर्षांचे सोहेल खानसोबतचं लग्न का तुटले? यावर फॅशन डिझायनरने उत्तर दिलं की आमची मतं जुळत नाहीत.

सीमा टपरिया यांनी सीमा सजदेह यांना पुढे विचारलं की, 'पण 22 वर्षांनंतर तुम्हाला समजलं की तुमची विचारसरणी जुळत नाही का?' यावर सजदेहने उत्तर दिलं की, या गोष्टींना वेळ लागतो. यासोबतच सीमा सजदेहने असा धक्कादायक खुलासा सर्वांसमोर केला की ऐकून सगळेच थक्क झाले. सीमा सजदेहने सांगितलं की, मला मुली आवडतात. हा एक विनोद होता.

सीमा सजदेह गमतीने म्हणाली, ''कदाचित मला स्त्रिया आवडतात'' हे ऐकून महीप कपूरला धक्का बसला आणि सीमा टपरियालाही धक्का बसला. दोघांचे एक्सप्रेशन पाहून सीमा सजदेह म्हणाली की, मी विनोद करत आहे. यानंतर सीमा टपरियाबद्दल म्हणाल्या, 'मला हे ऐकून घाम फुटला होता.