'आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता...', ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर Sayali Sanjeev झाली व्यक्त

ऋतुराज आणि सायली संजीव यांचं नातं अखेर जगा समोर आलचं...  क्रिकेटपटूसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य  

Updated: Dec 4, 2022, 02:16 PM IST
'आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता...', ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर Sayali Sanjeev झाली व्यक्त  title=

Sayali Sanjeev - Ruturaj Gaikwad : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सायलीला खरी ओळख ही 'काहे दिया परदेस' या  मालिकेतून मिळाली. सायलीनं आता पर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच सायली 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याच दरम्यान, सायली आणि भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यामध्ये असलेलं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे. 
 
सायली आणि ऋतुराज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला असताना अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत सायलीला ऋतुराज सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे सायलीने दिलेल्या उत्तराकडे सर्वांना थक्क केलं आहे. (Sayali Sanjeev - Ruturaj Gaikwad)

ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलू देखील शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे देखील मला माहित नव्हतं...' (Sayali Sanjeev break silence on relationship with ruturaj gaikwad)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सायली म्हणाली, 'आमच्या वयाबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. मी 29 वर्षांची आणि ऋतुराज 25 वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता आमच्यात गप्पा होत नाहीत.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. 

सायलीने 'काहे दिया परदेस' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यानंतर सायलीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सायलीचा (actress sayali sanjeev) आगामी सिनेमा 3 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.