मुंबई : मानसीचा चित्रकार तो" या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रे यांने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे. ऋत्विकचं मोहे पिया हे हिंदी नाटक संपूर्ण देशभरात गाजत आहे. अशातच ऋत्विकच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
ऋत्विकचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऋत्विकने आपल्या फेसबुक पेजवरुन "सरगम" या सिनेमाचं ऑफिशल पोस्टर शेअर केलं आहे. "सरगम" या सिनेमात या सिनेमात ऋत्विक मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातील ऋत्विकची भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
पोस्टरवर ऋत्विकच्या हातात कॅमेरा दिसतं असून दुसऱ्या पोस्टरवर ऋत्विक कॅमेऱ्याच्या मागे आपल्याला दिसतो आहे. ऋत्विक या सिनेमात नेमका कोणत्या भूमिकेत दिसतो याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.