VIDEO: सारा खानचा Ex-Husband तिसऱ्यांदा करतोय लग्न, गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Sara Khan Ex Husband : सारा खान या लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा हा तिसऱ्यांदा लग्नात अडकणार आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यानं इन्टाग्रामवरून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 19, 2023, 01:14 PM IST
VIDEO: सारा खानचा Ex-Husband तिसऱ्यांदा करतोय लग्न, गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज    title=
sara khan ex husband going to marry again propose video goes viral

Sara Khan Ex Husband : बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या लग्नाची अनेकदा 'कॉन्ट्रोव्हर्सी' रंगलेली असते. त्यांच्या घटस्फोटांचीही चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका कपलची. सारा खानबद्दल तुम्हाला माहितीच आहे. तिची सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा असते. आता तिचा पती तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे आणि त्यानं आपल्या नव्या गर्लफ्रेंडला चक्क बुर्ज खालिफाच्या खाली प्रपोज केलं आहे. सध्या त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. सारा खान ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिची 'बिदाई' हा मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे तिला बरीच ओळख प्राप्त झाली आहे. त्यानंतर तिनं बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याच शोमध्ये तिचे आणि अली मर्चंट यांचे लग्न झाले होते. यावरून तेव्हा बराच गदारोळही झाला होता. आजही ही किस्सा माध्यमांमध्ये चर्चेत असतो. 

अली मर्चंट आणि ती वेगळे झाले असून त्यांच्या नात्यातही बरेच वाद झाले होते. अली मर्चटनं दुसऱ्यांदाही लग्न केले होते. परंतु तेही फिस्कटले होते. आता अली मर्चंट हा दुसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली आहे. 2011 मध्ये सारा खान आणि अली मर्चंट हे विभक्त झाले. शोमध्ये असताना ते दोघं विवाहित झाले परंतु शोमधून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. सारा खान आजही सिंगल आहे परंतु अली मर्चंटनं 2016 मध्ये दुसरं लग्न केले होते. त्यामुळे तो बराच चर्चेत होता. परंतु त्याचे हे लग्नही फार काळ टिकले नाही. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या या तिसऱ्या गर्लफ्रेंडची. इन्टाग्रामवरच त्यानं एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यातून त्यानं आपल्या नव्या गर्लफ्रेंडला प्रपोज केला आहे. 

हेही वाचा : SRK सोबत काम करण्याची इच्छा अभिनेत्याच्या बायकोनं 'अशी' केली पूर्ण! पाहाच

आता त्याला तिसरं प्रेम मिळालं आहे. 18 ऑक्टोबर म्हणजे काल त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवरून त्यानं आपली गर्लफ्रेंड अंदलीब जैदीसोबत प्रपोजचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी आपण क्लिपमध्ये पाहू शकतो की, अली मर्चंट आणि अंदलीब जैदी एका बोटीत बसलेले आहेत आणि तेवढ्यात तो आपल्या गुडघ्यावर बसून तिला अंगठी घालताना दिसतो. यावेळी त्याच्या या ड्रीम प्रपोजलची जोरात चर्चा होती. यावेळी बुर्ज खलिफाच्या खाली बसून त्यानं तिला प्रपोज केलं आणि त्यांच्या मागून बॅकग्राऊंडला फुगेही उडताना दिसतात. आणि यावेळी त्यानं आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ती हो म्हणाली'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या माहितीनुसार, साराही रिलेशनशिपमध्ये आहे आणि अली मर्चंटची ही तिसरी गर्लफ्रेंड एक हैद्राबादची मॉडेल आहे.