'रंग बरसे भिगे...' साराचा भन्नाट होळी डान्स व्हिडिओ व्हायरल

साराने होळी सणाचा आनंद असा लुटला की...    

Updated: Mar 29, 2021, 03:54 PM IST
'रंग बरसे भिगे...' साराचा भन्नाट होळी डान्स व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : 'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री केली. अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी साराच्या चाहत्यांची यादी देखील खूपच मोठी असते. आतापर्यंत तिने अनेक सिनेमांमध्ये भन्नट भुमिका  साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता देखील तिने बॉलिवूडचं प्रसिद्ध 'रंग बरसे भिगे...' या गाण्यावर ठेका धरत मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा केला आहे. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नियमांचं पालन करत होळी सण साजरा करण्यात आला. अशात साराने देखील होळी या सणाचा आनंद लुटला आहे. तर तिने व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना होळी खेळण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 

साराने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या अवती-भोवती सर्वत्र रंग दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो  आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सारा फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर स्वभावामुळे देखील कित्येकांना आवडते.