सारा-कार्तिकच्या फोटोवर रणवीरची कमेंट; 'भूलना नही...'

या दोघांच्या फोटोवर काय म्हणला रणवीर...

Updated: Jul 3, 2019, 11:43 AM IST
सारा-कार्तिकच्या फोटोवर रणवीरची कमेंट; 'भूलना नही...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी 'लव आज कल २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. नुकतंच 'लव आज कल २' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने सारा अली खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये साराने कार्तिकसोबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साराने पोस्टमध्ये ती कार्तिकला मिस करणार असल्याचंही म्हटलंय. साराच्या या पोस्टवर रणवीर सिंहने मजेशीर कमेंट केली आहे.

साराने शेअर केलेल्या तिच्या आणि कार्तिकच्या फोटोला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे. साराच्या या पोस्टवर रणवीरने 'सो क्यूट...भूलना नही सबसे पेहेले किसने मिलवाया था' अशी पोस्ट करत रणवीरनेही त्यांच्या फोटोला पसंती दर्शवली आहे. 

सारा अली खान 'कॉफी विथ करण' शोमध्ये सैफ अली खानसोबत पोहचली होती. त्यावेळी कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं म्हणत साराने साऱ्या कलाविश्वाचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एका अवॉर्ड शोदरम्यान सारा आणि कार्तिक दोघेही पोहचले होते. पार्टीमध्ये रणवीरही होता. त्यावेळी रणवीरने सारा आणि कार्तिक यांची भेट करुन दिली होती. 

साराने सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'चित्रीकरणादरम्यान मला अगदी सहजपणे वावरण्याची अनुभूती दिल्याबद्दल तुझे आभार मानते. कॉफीपासून चहापर्यंत प्रत्येकदा माझी काळजी घेतल्याबद्दलही तुझे आभार. हे सारंकाही पुन्हा घडावं हीच माझी इच्छा आहे. तुला ठाऊक असेल त्याहीपेक्षा जास्त आणि मी व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त, मला तुझी आठवण येतच राहील...' असं म्हणत तिने कार्तिकचे आभार मानले आहेत. 

कार्तिकनेही फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या चित्रपटात रणदीप हुड्डाही प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं शिर्षक निश्चित करण्यात आलं नाही. परंतु हा चित्रपट 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वल आहे. १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.