सारा, करीनाला या नावाने मारते हाक?

काय आहे हे नाव? 

सारा, करीनाला या नावाने मारते हाक?  title=

मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करण सिझन 6 च्या चौथ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि सैफ अली खान आले होते. या शोमध्ये सारा अली खानने आपली सावत्र आई म्हणजे अभिनेत्री करीना कपूरसोबत आपलं असलेलं नातं शेअर करते. सारा सांगते की, ती अगदी सुरूवातीपासूनच करीना कपूरवर प्रभावीत होती. 

करीना कपूरच्या कभी खुशी कभी गम या सिनेमातील तिच्या 'पू' या कॅरेक्टरने सारा अली खान खूप प्रभावित झाली होती. सारा जेव्हा लहान होती तेव्हा तिने करीनाला पहिल्यांदा पू च्या रूपातच पाहिले आहे. साराने सांगितलं की, सुरूवातीपासूनच आमच्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. आमच्या मनात कोणत्याही नात्याबद्दल गोंधळ नाही. करीनाने साराला सांगितलं होतं की, तुझी आई खूप चांगली आहे. आम्ही कायमच चांगल्या मैत्रिणी राहिल्या आहोत. त्यामुळे करीनाला असं वाटतं की, साराने तिला करीना अशीच हाक मारावी. 

सारा या कार्यक्रमात असं म्हणाली की, अब्बाने सांगितलं की, करीना ही तुझी सावत्र आई आहे. तर तू तीला छोटी आई बोल. पण करिनाला छोटी मम्मी ऐकून खूप राग आला. तिने आम्हाला करीना अशीच नावाने हाक मारायला सांगितलं. करीना कपूर ही सैफची दुसरी पत्नी. तिच्यासोबत विवाहबद्ध होण्याच्याच दिवशी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग हिला एक पत्र लिहिलं होतं. सैफने या पत्रात अमृताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. इतकच नव्हे तर, त्याने लिहिलेलं हे पत्र खुद्द करीनानेही वाचलं होतं.