.... म्हणून सैफने अमृताला पाठवलेलं 'ते' पत्र

करीनाने हे पत्र वाचलं आणि...

Updated: Nov 19, 2018, 02:12 PM IST
.... म्हणून सैफने अमृताला पाठवलेलं 'ते' पत्र  title=

मुंबई: हिंदी कलाविश्वात अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील लहानमोठ्या कृतींनी सर्वांना प्रेरित केलं. कोणत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी या कलाविश्वात चर्चा झाल्या, तर कोणी नात्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. 
अभिनेता सैफ अली खान याच्या खासागी आयुष्यातही असंतच काहीसं घडलं. ज्याचा खुलासा त्याने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये केला. 

सैफ या शोमध्ये पहिल्या पत्नीपासून म्हणजे अमृता सिंग हिच्यापासून असणाऱ्या आपल्या मुलीसोबत या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी या वडील-मुलीच्या जोडीने बऱ्याच विषयांवर गप्पा मारत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सर्वांसमोर उघड केल्या. 

करीना कपूर ही सैफची दुसरी पत्नी. तिच्यासोबत विवाहबद्ध होण्याच्याच दिवशी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग हिला एक पत्र लिहिलं होतं. 

सैफने या पत्रात अमृताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. इतकच नव्हे तर, त्याने लिहिलेलं हे पत्र खुद्द करीनानेही वाचलं होतं. 

करीना ही प्रत्येक गोष्टीत नेहमीच आपल्याला साथ देत आली आहे, असंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. किंबहुना हे पत्र अमृताला पाठवावं असंही तिनेच सैफला सुचवलं होतं. त्यामुळे नात्यांमधी कटुता कमी करण्याचा हा एक वेगळा प्रयत्न होता असं म्हणायला हरकत नाही.