'हा' फोटो पाहून तैमुर आणि सारा ही जुळी भावंडं असल्याचा भास होईल....

करिना कैफ आणि सैफ अली खानपेक्षा आजकाल त्यांच्या मुलाची म्हणजेच तैमुर अली खानची चर्चा अधिक असते.

Updated: Mar 13, 2018, 09:57 PM IST
'हा' फोटो पाहून तैमुर आणि सारा ही जुळी भावंडं असल्याचा भास होईल....  title=

मुंबई : करिना कैफ आणि सैफ अली खानपेक्षा आजकाल त्यांच्या मुलाची म्हणजेच तैमुर अली खानची चर्चा अधिक असते.

तैमुरचा जन्म झाल्यापासून आजतागायत वर्षभरात त्याचे क्लिक झालेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

इंस्टाग्रामवर खास पोस्ट 

तैमुरचे अनेक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. पण आज असा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये सारा अली खान आणि तैमुर  हे खरंच ट्विन भावंड असावेत असं वाटतं.  

सोशल मीडियावर एका फॅनने कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा अली खान आणि तैमुरच्या लहानपणीच्या फोटोचा समावेश आहे. या फोटोमध्ये सैफ दोघांच्याही कपाळावर किस करताना दिसत आहे. 

 

तैमुर आणि सारा दोघं सावत्र भावंडं 

तैमुर हा सैफ आणि करिना कपुरचा मुलगा आहे. अवघ्या वर्षभराच्या तैमुरने सोशलमीडियाला वेड लावलं आहे.

करिनाशी लग्न करण्यापूर्वी सैफ आणि अमृता सिंग एकत्र होते. ऑक्टोबर 1991 साली सैफ अमृताशी विवाहबद्ध झाला होता. सैफ आणि अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यापैकी एक म्हणजे सारा. सध्या सारा विशीत आहे. लवकरच 'केदारनाथ' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.