कार्तिक आर्यनच नाही तर, 'या' 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध

फक्त कार्तिकच नाही तर, 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध, त्यामधील एकाचं प्रसिद्ध राजकारणी कुटुंबाशी खास कनेक्शन  

Updated: Oct 3, 2022, 11:27 AM IST
कार्तिक आर्यनच नाही तर, 'या' 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध  title=

Sara Ali Khan Relationship : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायम तिच्या अभिनयामुळे आणि स्वभावामुळे चर्चेत असते. 'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या साराने कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 'केदारनाथ' सिनेमानंतर साराने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सारा अली खान फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या साराच्या Relationship च्या चर्चा रंगत आहेत.

काही दिवसांपूर्वी सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यनच्या (kartik aaryan) नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. पण कार्तिकला डेट करण्यापूर्वी साराच्या आयुष्यात 3 व्यक्ती होत्या. त्या तीन व्यक्ती कोण आहेत जाणून घेवू

अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khattar)
सारा अभिनेता शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) भाऊ ईशान खट्टरला डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. 'कॉफी विथ करण'शोमध्ये साराने सांगितले की मी दोन फिल्मी भावांपैकी एकाला डेट केले आहे. त्यामुळे तो दुसरा तिसरा कोणी नसून ईशान असल्याच्या चर्चा रंगल्या. सारा अली खान आणि ईशान खट्टर एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा दिसले होते. (Ishaan Khattar with sara ali khan)

अभिनेता हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor)
हर्षवर्धन कपूर आणि साराच्या अफेअर आणि डेटींगबद्दल सर्वांना माहित आहे. सोशल मीडियावरील दोघांच्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पण दोघांच्या ब्रेकअपचं कारण कधीही समोर आलेलं नाही. (Harshvardhan Kapoor with sara ali khan)

वीर पहाडिया (veer pahariya)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सारा अली खानने एका राजकारण्याच्या नातवाला डेट केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया आणि साराच्या अफेरनेमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं.  त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र ब्रेकअपनंतर अभिनेत्री सारा अली खाननेही ते फोटो डिलीट केले. (veer pahariya sara ali khan)

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan)
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री सारा अली खानचा कार्तिक आर्यनवर प्रचंड क्रश होता आणि ते खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. 'लव आज कल 2' प्रदर्शित झाल्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.