अरेरे!!! सारा अली खानवर रस्त्यावर पैसे मागण्याची वेळ...पैशांसाठी करतेय हे काम

सारा अली खान बॉलीवूडमधील एका मोठ्या कुटुंबातील अभिनेत्री आहे. मग असं काय झालं की, साराला भारतीसोबत रस्त्यावर फिरून पैसे मागावे लागले?

Updated: May 8, 2022, 09:03 AM IST
अरेरे!!! सारा अली खानवर रस्त्यावर पैसे मागण्याची वेळ...पैशांसाठी करतेय हे काम title=

मुंबईः बॉलिवूड इंडस्ट्रीत तरुण वयात आपली छाप पाडणाऱ्या सारा अली खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सारा अली खानसोबत कॉमेडी क्वीन भारती सिंगही दिसत आहे. भारती आणि साराचा हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हालाही थोडा धक्का नक्कीच बसेल.

सारा अली खान बॉलीवूडमधील एका मोठ्या कुटुंबातील आहे. सिनेसृष्टीतही तिचे चित्रपट चांगले चालले आहेत. मग असे काय झाले की, साराला भारतीसोबत रस्त्यावर फिरून पैसे कमवावे लागले ऐकून धक्का बसला ना? तर काळजी करू नका. जाणून घ्या सारा आणि भारतीच्या व्हिडिओचं सत्य.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर गाताना दिसत आहे. पैशासाठी ती लोकांना ऑटोग्राफ द्यायलाही तयार आहे. ती लोकांना पैसे देऊन तिच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगते. सारा हे सर्व स्वत:च्या मर्जीने करत नाही, तर ती तिचे टास्क पूर्ण करत होती, जे तिला फराह खानकडून 'द खतरा खत शो' या कॉमेडी गेम शोमध्ये मिळाला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @mixxsongss (@mixxsongss)

फराह खानच्या सांगण्यावरून तिने हे आव्हानात्मक काम करण्यास होकार दिला आणि मग बस मिशन पूर्ण करण्यासाठी भारती सिंगसोबत सारा रस्त्यावर उतरली. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, साराला गाणे गाताना आणि तिला सेल्फी घेण्यास सांगून रस्त्यावर फिरण्यात मजा आली. पण, चांगली बातमी अशी आहे की साराने तिची टास्क पूर्ण केली, मग त्याच पैशातून आई-वडील झाल्याच्या आनंदात हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगसाठी मिठाईचा डबा घेऊन ती 'द खतरा शो'मध्ये पोहोचली.