Sara Ali Khan ने शेअर केला Varun Dhawan सोबतचा फोटो; इन्टाग्रामवर म्हणाली...

IFFI 2022 Sara Ali Khan And Varun Dhawan: वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Enjoying A Beach Day In Goa) होताना दिसतोय.

Updated: Nov 20, 2022, 07:24 PM IST
Sara Ali Khan ने शेअर केला Varun Dhawan सोबतचा फोटो; इन्टाग्रामवर म्हणाली... title=
Sara Ali Khan,Varun Dhawan

Varun Dhawan Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) म्हणजे तरूणांच्या गळ्यातील ताईत. सध्या वरूण धवन (Sara Ali Khan) नव्या भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कृति सैनन (Kriti Sanon) देखील दिसणार आहे. अशातच आता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Enjoying A Beach Day In Goa) होताना दिसतोय. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

वरूण धवने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून (Varun Dhawan Instagram) एक फोटो शेअर केलाय. तर दुसरीकडे सारा अली खानने देखील वरूण धवनसोबतचा (Sara Ali Khan Instagram) एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये वरूण धवन शर्टलेस दिसतोय तर सारा देखील लाल बिकनीवर दिसत आहे. वरूणने हा फोटो शेअर करत iffi2022 अशी कमेंट केली. 

आणखी वाचा - इंटीमेट सीनसाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीला केली होती Ex husband ने मदत म्हणाली, 'मी डोळे...'

साराने शेअर केलेल्या फोटोवर  Sea You असं साराने लिहिलंय. गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 ला (iffi 2022) सुरूवात होणार आहे. यावर्षी 100 वर्ष पुर्ण झाल्याने भारतीय चित्रपटांचा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात वरुण धवन आणि सारा अली खान परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा फोटो - 

दरम्यान, कार्तिक आर्यन, मृणाल ठाकूर आणि इतर अनेक स्टार्स देखील मनोरंजनाची भर घालताना दिसतील. वरूण आली साराची केमेस्ट्री अनेकांना आवडली आहे. या दोघांनी 2020 साली आलेल्या कुली नंबर 1 या चित्रपटात सोबत काम केलं होतं. त्यानंतर आता त्यांचा फोटो व्हायरल होताना दिसतोय.