जाळ अन् धूर संगच...सपना चौधरी, राखी सावंतचा एकाच मंचावर धुरळा

राखी सावंत आणि सपना चौधरी यांनी एकत्र स्टेज शेअर केला होता आणि त्यानंतर राखीचा हरियाणवी डान्स पाहून खूप टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या होत्या.

Updated: May 25, 2022, 02:04 PM IST
जाळ अन् धूर संगच...सपना चौधरी, राखी सावंतचा एकाच मंचावर धुरळा title=

मुंबईः सपना चौधरी आणि राखी सावंत या दोघीही चांगल्या डान्सर आहेत. जर या दोन्ही एका मंचावर एकत्र आल्या तर मग बोलायलाच नको

सपना चौधरी ही हरियाणवी डान्सर आहे, तर राखी सावंत बॉलिवूड डान्सर आहे. जेव्हा या दोन्ही एकाच मंचावर डान्स करतात त्यावेळी काय होत असेल याचा तुम्ही विचार करा.

काही वर्षांपूर्वी असंच घडलं होतं जेव्हा राखी सावंत आणि सपना चौधरी यांनी एकत्र स्टेज शेअर केला होता आणि त्यानंतर राखीचा हरियाणवी डान्स पाहून खूप टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या होत्या.

डिओमध्ये सपना चौधरी आणि राखी सावंत 'तेरी आंख का ये काजल' या सुपरहिट हरियाणवी गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत.सपना तिच्या स्वत:च्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते तर राखीही तिच्या स्टेप तंतोतंत फॉलो करत आहे आणि लोक तिच्या स्टाइलवर टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये दोघांची बॉन्डिंग आणि केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत 94 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. राखी आणि सपनाचे हे फ्युजन तुम्ही कधीही पाहिलं नसेल.

सपना चौधरी आज मोठी स्टार आहे आणि मोठी स्टार झाल्यानंतरही तिला स्टेजवर डान्स करायला आवडते, ती आजही स्टेज परफॉर्मन्स देते आणि आजही सपनाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. सपना अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

राखी सावंतबद्दल बोलायचं तर, सध्या राखी तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत आहे. राखीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप एंगेजमेंटही केल्याचे वृत्त आहे आणि लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.