कोट्यवधींची माया कमावणाऱ्या Sapna Chaudhary चं शिक्षण ऐकून बसेल धक्का

डान्समुळे चाहत्यांना घायाळ करणाऱ्या Sapna Chaudhary चं शिक्षण आणि खासगी आयुष्य...   

Updated: Aug 20, 2022, 12:24 PM IST
कोट्यवधींची माया कमावणाऱ्या Sapna Chaudhary चं शिक्षण ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : सपना चौधरी (Sapna Chaudhary) एक भारतीय नृत्यांगना आणि स्टेज परफॉर्मर आहे. स्टेज प्लॅटफॉर्मवर सपना अनेक प्रसिद्ध गाण्यावर थिरकते. एवढंच नाही तर, तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इंटरनेटवर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. अनेकदा सपना हरियाणवी गाण्यांवर नाचताना दिसते. बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून देखील तिने चाहत्यांच्या मनात स्वतःची खास जागा निर्माण केलं आहे. आज, कोट्यवधींची माया कमावणाऱ्या सपनाचं शिक्षण जाणून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. 

सपना चौधरीने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. सपनाने बारावीत कला विषय निवडला होता. सपनाला अभ्यासात रस होता, पण तिला परीक्षेची भीती वाटायची. विज्ञान आणि वाणिज्य शाखेची भीती असल्याने सपनाने आर्ट्स घेतले.

सपनाचा जन्म 25 सप्टेंबर 1990 रोजी रोहतकमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिने सुरुवातीचे शिक्षणही रोहतक येथून केले. वडील रोहतकमध्ये एका खासगी कंपनीत काम करायचे. वडिलांच्या निधनानंतर मात्र ती इतकी व्यस्त झाली की तिला पुढचा अभ्यासही करता आला नाही.

आपल्या डान्समुळे कायम चर्चेत असते. पण सपना तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सपनाच्या लाखो चाहत्यांच्या तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत फारशी माहिती नाही. मुख्य म्हणजे बाळाच्या जन्माची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचताच अखेर सपनाच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनीही जोर धरला. सपनाने वीर साहूसोबत गुपचूप लग्न केलं.

.... म्हणून सपना चौधरीला गुपचूप करावं लागलेलं लग्नं

वीर साहू आहे तरी कोण? 
वीर साहू हा एक गायक, संगीतकार, गीतकार आणि हरयाणवी अभिनेता आहे. बब्बू मान या नावानंही तो ओळखला जातो. संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी म्हणून त्यानं वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण सोडलं होतं.  2016 मध्ये 'ठाडी बॉडी' या म्युझिक व्हिडिओनं त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली होती.