संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड होणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला  आगामी "बेधडक" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 4, 2018, 12:27 PM IST
संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट  'बेधडक'  title=

मुंबई : संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड होणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला  आगामी "बेधडक" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

"बेधडक"चं पहिलं टायटल पोस्टर जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच या चित्रपटानं उत्सुकता निर्माण केली होती. आता या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियात नुकतंच  लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेला बलदंड हात दिसत आहे. तसंच "सामान्य स्वप्नांचा, असामान्य पाठलाग" अशी टॅगलाईनही दिसत आहे.  त्यावरून हा चित्रपट बॉक्सिंगवरचा आणि अॅक्शनपॅक्ड असणार हे स्पष्ट होत आहे. 

'बेधडक' सिनेमाचं वेगळेपण

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते 
अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे 

'बेधडक' हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्या अभिनेत्याचं या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. त्यामुळे सुटीच्या काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळेल', असं निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितलं.