'गुदमरून मारण्यासाठी केलेले contract...', अभिनेता Santosh Juvekar ची पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar on Pollution : संतोष जुवेकर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेहमीच अनेक गोष्टींवर वक्तव्य करत असतो. दरम्यान, संतोषनं सध्या सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 16, 2023, 04:03 PM IST
'गुदमरून मारण्यासाठी केलेले contract...', अभिनेता Santosh Juvekar ची पोस्ट चर्चेत  title=
(Photo Credit : Social Media)

Santosh Juvekar on Pollution : लोकप्रिय मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा नेहमीच चर्चेत असतो. संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत संतोष त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. इतकंच काय तर संतोष त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी देखील ओळखला जातो. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत संतोषनं मुंबईत असलेल्या प्रदुषणावर वक्तव्य केलं आहे. (Santosh Juvekar Viral Video)

संतोषनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत संतोषनं एक व्हिडीओ त्यात शेअर केला आहे. व्हिडीओत संतोष सुरुवातील त्याच्या समोर दिसत असणारं आभाळ दिसत आहे. त्यानंतर प्रदुषण दाखवलं आहे. संतोषनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की 'हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी केलेले कॉन्ट्रॅक्ट किंवा स्वतः गुदमरून मरण्यासाठी केलेली सोय?' संतोषचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. (Santosh Juvekar Video On Pollution)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संतोषनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणाला, 'सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आपण फक्त बघा आणि शांत बसा, असंच होणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'महाराष्ट्रात सर्वात प्रदूषित शहर झालं आहे नवी मुंबई. भारतातील सर्वात स्वच्छ महानगरपालिक असून पण हे हाल आहेत एक प्लॅन सिटी , चांगली कनेक्टिव्हिटी असून पण हे हाल'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'कुठे गेले प्रदूषण अधिकारी - पोलीस यंत्रणा - साध आपल्या गाडीला लगेच puc नसेल तर दंड' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आकाशी उंच उडणारे पक्षी पण त्या धुरातून गुदमरून ओरडत इकडून तिकडून उडताना दिसत आहेत किती भयानक आहे हे सर्व!!'

हेही वाचा : गाण्यांमध्ये महिलांचा अपमान! Honey Singh म्हणतो, 'मला मुलींच्या लग्नात परफॉर्म करायला का बोलवता?'

संतोषनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. संतोषनं काम केलेल्या झेंडा आणि मोरया या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तसेच त्यानं अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. दरम्यान, संतोषच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच ‘36 गुण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आवडला होता. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. संतोषच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसते. त्याचे इन्स्टाग्रामवर हजोरा चाहते आहेत