मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.
पद्मावतीच्या ट्रेलरला अअणि घुमर गाण्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. पण त्यासोबतच काही संघटनांनी मात्र या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.
करणीसेना, राजपूत संघटनांनी चित्रपटगृहाची तोडफोड करू असा धमकी वजा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संजय लीला भंसाळी यांनी 'पद्मावती'साठी सुमारे १६० कोटींचा विमा काढला आहे.
बॉलिवूडलाईफ.कॉमच्या माहितीनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आंदोलन, तोडफोड किंवा चित्रपटगृहांचे काही नुकसान झाल्यास वीमा पॉलिसीमुळे कंपनी त्याचे नुकसान भरून काढेल.
सिनेमाच्या सिनियर एक्झिकीटीव्हच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाला होणारा विरोध पाहता कदाचित दर्शक चित्रपटाकडे पाठ फिरवू शकतात. ज्यामुळे सिनेमाचे साहाजिकच मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
जयपूर शहरात 'पद्मावती'ला होणारा विरोध वाढतो आहे. अनेक सिनेमा हॉलच्या मालकांना धमक्या देण्यात आल्या आहेत.. जयपूरप्रमाणेच चित्तोडगडमध्येही चित्रपटाला तीव्र विरोध सुरू झाला आहे. त्यांच्यामते, 'पद्मावती' चित्रपटामध्ये महाराणीला चूकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. म्हणूनच या चित्रपटाला प्रदर्शित करू नये.
'पद्मावती' चित्रपटामध्ये महाराणीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. सोबत राजा रवल रतन सिंगच्या भूमिकेत शाहीद कपूर तर अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेत रणवीर सिंग झळकणार आहे.