संजय दत्तने पहिल्यांदा केलं 'फॅमिली फोटो शूट'

संजय दत्तने पहिल्यांदा आपल्या ट्विन्ससोबत फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट त्याने मॅगझिनसाठी केलं आहे. संजय दत्तने या फोटोशूटमधून आपण एक उत्तम बाप असल्याचं दाखवून दिलं आहे. 

Updated: Nov 13, 2017, 08:17 PM IST
संजय दत्तने पहिल्यांदा केलं 'फॅमिली फोटो शूट'  title=

मुंबई : संजय दत्तने पहिल्यांदा आपल्या ट्विन्ससोबत फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट त्याने मॅगझिनसाठी केलं आहे. संजय दत्तने या फोटोशूटमधून आपण एक उत्तम बाप असल्याचं दाखवून दिलं आहे. 

संजय दत्तने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  यामध्ये शाहरान आणि मुलगी इक्रासोबत खूप छान केमेस्ट्री जमलेली दिसत आहेत. यावेळी संजय दत्तने म्हटलं आहे की, माझ्यासाठी हे दोघे माझी दुनिया आहे. आणि या फोटो शूटसाठी हिंदुस्तान टाईम्स ब्रँचचे आभार मानले आहेत. 

संजय दत्त असं म्हणतो की, आपल्या मुलांना मोठं होताना पाहणं, त्यांना समजुतदार होताना पाहणं हे अतिशय कौतुकास्पद आहे. जेव्हा हॉटेलमध्ये ते स्वतःच जेवणं स्वतः ऑर्डर करतात तेव्हा खूप कौतुक वाटतं. हा एक खास एहसास है. त्याला बघून भरपूर आनंद होतं. 

 

They are the world to me! Thank you @htbrunch for this fun shoot with Shahraan and Iqra.

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

तसेच त्याने आपल्या या ट्विन्स मुलांबद्दल देखील म्हटलं आहे की, आता हे दोघं मला सांगतात मला काय पेहराव केलं पाहिजे. जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो तेव्हा इक्रा माझ्यासाठी टी शर्ट आणि टॉयज खरेदी करते. संजय दत्त एक जबाबदार पालकाप्रमाणे मुलांच्या शाळेच्या मिटिंग, प्रोग्रामला हजेरी लावतो. त्याचप्रमाणे त्या दोघांना टिफिनमध्ये काय दिले पाहिजे याकडे देखील पूर्ण लक्ष देतो. एवढंच काय तर संजय इक्रा आणि शाहरानसोबत बसून क्रिकेट देखील पाहतो.