संजूबाबाने 62 व्या वर्षी ओलांडल्या मर्यादा, ज्यामुळे स्वतःला थांबवू शकली नाही पत्नी

खुद्द संजय दत्तच्या पत्नीने फोटो शेअर करत केला त्या गोष्टीचा खुलासा  

Updated: Mar 29, 2022, 10:39 AM IST
संजूबाबाने 62 व्या वर्षी ओलांडल्या मर्यादा, ज्यामुळे स्वतःला थांबवू शकली नाही पत्नी title=

मुंबई : सुपरस्टार संजय दत्त सध्या त्याच्या आगामी 'केजीएफ चॅप्टर 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सिनेमासाठी संजय दत्तने स्वतःच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनसाठी खूप मेहनत घेतली. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तने संजय दत्तच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर करत एक खास कॅप्शन लिहिले आहे.

मान्यताने शेअर केलेल्या फोटोमध्ये संजय दत्त जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. मान्यताना फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'आणि तुझी गर्जना पुन्हा होवू दे....' असं लिहिलं आहे. 

Sanjay

वयाच्या 62 व्या वर्षी संजूबाबचं हे भन्नाट लूक पाहून तरूणांना देखील धक्का बसेल. कारण संजय दत्तचं बॉडी ट्रांसफॉर्मेशनसमोर बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते देखील फिके आहेत.