'दिल बेचार'मधील संजनाचा सुशांतसोबत फर्स्ट लूक टेस्ट

'दिल बेचारा' हा चित्रपट संजनासाठी पहिला चित्रपट ठरला तर सुशांतसाठी अखेरचा.   

Updated: Aug 4, 2020, 02:41 PM IST
'दिल बेचार'मधील संजनाचा सुशांतसोबत फर्स्ट लूक टेस्ट   title=

मुंबई : 'दिल बेचारा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री संजना सांघीने चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक टेस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. हा लूक टेस्ट तिच्या अभिनय पहिला लूक टेस्ट ठरला तर सुशांतच्या आयुष्यातील अखेरचा. २४ जुलैरोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने असंख्य चाहत्यांची मने जिंकली. एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या मॅनी आणि किझी बासू यांच्या नात्याभोवती फिरणाऱ्या कथेला चाहत्यांकडून भरपूर दाद मिळाली. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता संजनाने देखील सुशांतसोबत केलेला  फर्स्ट लूक टेस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये  'सुशांत आणि संजनाचा मॅनी आणि किझी बासू रूपातील फर्स्ट लूक टेस्ट...' असं लिहिलं आहे. 

'दिल बेचारा' हा चित्रपट संजनासाठी पहिला चित्रपट ठरला तर सुशांतसाठी अखेरचा. १४ जुलै रोजी सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी  गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या अत्महत्येमागचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिस याप्रकरणी कसून तपास करत आहेत