'सांड की आँख' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

शार्पशूटर प्रकाशी  तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

Updated: Jul 11, 2019, 02:48 PM IST
'सांड की आँख' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित title=

मुंबई : अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू स्टारर 'सांड की आँख' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शूटर दादीच्या भूमिकेत या दोन्ही अभिनेत्रींचा अनोखा अंदाज रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 'सांड की आँख' उत्तर प्रदेश मधील गावातल्या वृद्ध शार्पशूटर प्रकाशी  तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

'सांड की आँख' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मूहुर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. टीझरमध्ये भूमि आणि तापसी शूटर बणण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, हे दाखवण्यात आले आहे. अनेक समस्यांना सामोरे जात या दोघांनी कशा प्रकारे ३५२ मेडलवर आपले नाव कोरले. 

त्याचप्रमाणे त्यांचा प्रवास इत्यादी गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच जोर धरत आहे. आता तापसी आणि भूमीचा 'सांड की आँख' चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहाणे मजेशीर ठरणार आहे.