'फोर्ब्स'च्या सर्वाधिक कमाईच्या यादीत भारतातला एकमेव खिलाडी कुमार

जाणून घ्या आणखी कोणत्या कलाकारांनी या यादीत बाजी मारली आहे...

Updated: Jul 11, 2019, 02:04 PM IST
'फोर्ब्स'च्या सर्वाधिक कमाईच्या यादीत भारतातला एकमेव खिलाडी कुमार  title=

नवी दिल्ली : सेलिब्रिटीजमध्ये प्रसिद्धीसह त्यांच्या कमाईच्या आकड्यांमध्येही नंबर वन राहण्याची स्पर्धा सुरु असते. 'फोर्ब्स' मासिकाने नुकतीच World's Highest Paid entertainers list जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये बॉलिवूड खिलाडी कुमारने बाजी मारली आहे. भारतीय कलाकारांपैकी अक्षय कुमार हे 'फोर्ब्स'च्या जगातील सर्वाधित कमाई करणाऱ्या यादीतील एकमेव नाव आहे. 

'फोर्ब्स'ने जगभरातील वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अक्षय कुमार ३३व्या क्रमांकावर आहे. अक्षयची एक वर्षात केली गेलेली कमाई ६५ मिलियन डॉलक इतकी आहे. अक्षयच्या या कमाईने बॉलिवूड कलाकारांनाच नाही तर हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे. रिहाना, जॅकी चैन, ब्रेडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही पिछाडीवर टाकलं आहे. 

अक्षय, आर्यन मॅन म्हणजेच रॉबर्ट डाउनी ज्यूनियरच्याही अगदी जवळ पोहचला आहे. रॉबर्ट डाउनी ज्यूनियरने ६६ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. 

'फोर्ब्स'च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये अमेरिकन गायिक टेलर स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. टेलर स्विफ्टची गेल्या वर्षीची कमाई १८५ मिलियन (जवळपास १२६४ कोटी) इतकी होती. टेलर स्विफ्ट २०१६ पासून या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

टेलर स्विफ्टनंतर, मॉडेल काइली जेनर १७० मिलियन डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर, अर्जेंटीनाचा प्रसिद्धी फुटबॉलपटू लियोन मेसी चौथ्या तर ब्रिटिश गायक एड शीरन पाचव्या क्रमांकावर आहे.

अक्षय कुमारने वर्षातील चार चित्रपट केल्याने, तसंच ते चित्रपट सुपरहिट ठरल्याने कमाईच्या आकड्यामध्ये तो वरचढ ठरला आहे. याशिवाय जाहिरात क्षेत्रातही अक्षय अनेक कलाकारांना टक्कर देत आहे. यावर्षी अक्षयचा 'केसरी' प्रदर्शित झाला. त्याशिवाय 'मिशन मंगल', 'हाऊसफुल ४', 'गुड न्यूज', 'सुर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.