नवी दिल्ली : नुकताच सलमान खान आणि 'बिग बॉस'फेम सना खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला होता. या व्हिडिओत सलमान खान सनाशी गळाभेट घेताना थोडा अनकम्फर्ट दिसला होता.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं ट्रोल झाल्यामुळे सना खान चांगलीच भडकलीय. अगदी साध्या पद्धतीनं एकमेकांची भेट घेणारा हा व्हिडिओ अशा पद्धतीनं ट्रोल होऊ शकतो, यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीय, अशी प्रतिक्रिया सना खान हिनं दिलीय.
याबद्दल सनाला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, 'मी काही अशी व्यक्ती नाही, जिला भेटून सलमान खान अनकम्फर्टेबल होईल... अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या व्यक्तीला वाईट वागणूक देत आहात... असंही नाही की सलमाननं मला पाहिलं नाही. तो याच पद्धतीनं गळाभेट घेत असावा, मला काय माहीत... त्यानं असं का केलं याबद्दल मला काहीही माहित नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर केवळ सलमानच देऊ शकेल', असं सनानं म्हटलंय.
'मी काही वेडी नाही जी समोरच्या व्यक्तीला इच्छा नसतानाही त्याच्या गळ्यात पडेल. माझे सलमानसोबत चांगले संबंध आहेत' असंही सनानं म्हटलंय.
सना पहिल्यांदा सलमानला २०१२ मध्ये बिग बॉस या कार्यक्रमादरम्यान भेटली होती.