सामंथा रुथ प्रभूला मोठा धक्का, एक्स पती नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत?

 समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. 

Updated: Apr 19, 2022, 08:32 PM IST
सामंथा रुथ प्रभूला मोठा धक्का, एक्स पती नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? title=

मुंबई : साऊथ चित्रपटातील कलाकार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. जवळ-जवळ 10 वर्षांच्या नात्याला ब्रेक लावत हे कपल वेगळं झालं. घटस्फोटाच्या घोषणेनंतर, दोन्ही स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. त्याचबरोबर आता नागा चैतन्यबाबत एक बातमी समोर येत आहे.

खरंतर, अशी बातमी समोर येत आहे की, घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या 6 महिन्यांतच चित्रपट स्टार नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. चित्रपट स्टार नागा चैतन्य पुन्हा लग्न करणार असल्याचं कानावर येत आहे. अशीही बातमी आहे की, यावेळी तो कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाही तर इंडस्ट्रीबाहेरील कोणाशी तरी लग्न करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नागा चैतन्य खूपच तुटला आहे. अशा परिस्थितीत त्याचे कुटुंबीय नागाच्या लग्नासाठी विचार करत आहेत. मात्र, याबाबत कुटुंबीयांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

काही दिवसांआधी अशीही बातमी आली होती की, चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक समंथा आणि नागा यांच्यासोबत चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. या वृत्तानंतर चाहत्यांनाही या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा आहे. मात्र आतापर्यंत समंथा आणि नागा यांनी या प्रकरणावर मौन पाळलं आहे, सध्या चाहते त्यांच्या वक्तव्याची वाट पाहत आहेत.

सामंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवट 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'ओ अंतवा' या आयटम साँगमध्ये दिसली होती. या गाण्यात तिने आपल्या बोल्ड अभिनयाने सर्वांना घायाळ केलं होतं. या चित्रपटानंतर तिला चित्रपटांची ओढ लागली आणि ती लवकरच 'यशोदा' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर नागा चैतन्य आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.