नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...'

Samantha Post After Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि  शोभिता धूलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर आता समंथाने आपल्या भावना इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यात.

सौरभ तळेकर | Updated: Aug 25, 2024, 07:03 PM IST
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...' title=
Samantha Post After Naga Chaitanya Engagement

Samantha Ruth Prabhu Cryptic Post : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यानं (Naga Chaitanya) नुकताच अभिनेत्री शोभिता धूलिपालासोबत (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आपलं नातं पुढं नेण्याचा निर्णय घेतला. एंगेजमेंटनंतर दोघांचा फोटो नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला होता. अशातच आता नागा चैतन्यच्या दुसऱ्या सारखपुड्यानंतर समंथाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. समंथाने (Samantha Ruth Prabhu) शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

बरेच लोक मैत्री आणि नातेसंबंधांना परस्पर म्हणून पाहतात आणि या गोष्टीशी मी सहमत आहे. तुम्ही द्या मग मी देखील देईल. परंतु मागील काही वर्षांमध्ये मला ही गोष्ट जाणवली की, बऱ्याचदा प्रेमासमोर समोरची व्यक्ती काहीही देण्याच्या तयारी नसताना आपण त्या व्यक्तीला खूप काही देतो, असं पोस्टमध्ये म्हटलंय.

जोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला परत काही देण्याच्या स्थितीत येत नाही तोपर्यंत हे सुरु राहील. मला वाटतं की प्रेम म्हणजे त्याग आहे.  माझ्याकडे काहीही नसताना लोकांनी मला कायम काहीतरी दिलंच आहे, अशी पोस्ट समंथाने शेअर केली आहे.

दरम्यान, समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झालं होतं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट जाहीर केला होता. घटस्फोटानंतर दोघं पुन्हा एकत्र येतील अशी आशा होती. पण चैतन्यचे नाव शोभिता धुलिपालासोबत जोडलं जाऊ लागलं अन् समंथाच्या आशा दुरावत गेल्या. अखेर 8 ऑगस्ट 2024 रोजी चैतन्य आणि शोभिता यांनी सारखपुडा उरकला अन् सर्वांना धक्का दिला.