पतीला घटस्फोट देऊन महागड्या बिकिनीत अभिनेत्रीचा बोल्ड लूक

पतीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीचा बिकिनी लूक व्हायरल, तिच्या बिकिनीची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Jun 8, 2022, 09:47 AM IST
पतीला घटस्फोट देऊन महागड्या बिकिनीत अभिनेत्रीचा बोल्ड लूक title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणत्या जोडीचं घटस्फोट होईल आणि कधी कोणचं सूत जूळेल काही सांगता येत नाही. घटस्फोटानंतरही सेलिब्रिटी तुफान चर्चेत असतात. आता एक अभिनेत्री घटस्फोट आणि तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर बिनधास्त जगणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू  (Samantha Ruth Prabhu) आहे. 

फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत तडजोड न करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सामंथा. आता पुन्हा एकदा सामंथाचा बोल्ड लूक चर्चेत आहे. सामंथाने अशी बिकिनी घातली आहे ज्याची किंमत चाहत्यांच्या थक्क करणारी आहे. 

'द टॉलीवूड क्लोसेट' नावाच्या इंस्टाग्राम पेजने समंथाच्या बिकिनी लूकची किंमत सांगितली आहे. अभिनेत्रीने 'बरबेरी' ब्रँडची बिकिनी घातली आहे. तिने खाली पँट घातली असली तरी तिच्या बिकिनी सेटची किंमत 33,343 रुपये आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सामंथाच्या या लूकवरून ती एक रॉयल आयुष्य जगते हे स्पष्ट झालं आहे. टू पीस बिकिनीवर 34 हजार रुपये खर्च करणारी समंथा अनेकदा क्लासी आणि महागड्या ड्रेसमध्ये दिसली.

समंथा तिच्या स्टाईल सेन्ससोबतचं खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. समंथाने पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्याने खूप चर्चेत होती. आज देखील नागा आणि समंथाच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 

रिपोर्टनुसार, समंथाने 100 कोटी रुपये पोटगी नाकारली होती. आता समंथा करिअरवर आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करून एक दर्जेदार जीवनशैली जगत आहे. घटस्फोटानंतर 100 कोटी रुपयांची पोटगी नाकारणारी समंथा आज कोट्यवधी रुपयांची मालकिण आहे.