घटस्फोटानंतर प्रचंड बोल्ड झाली Samantha Ruth, ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये वाढवलं इंटरनेटचं तापमाण

Samantha Ruth घटस्फोटानंतर झाली प्रचंड बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क  

Updated: Aug 20, 2022, 11:21 AM IST
घटस्फोटानंतर प्रचंड बोल्ड झाली Samantha Ruth, ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये वाढवलं इंटरनेटचं तापमाण title=

मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अतिशय गाजलेली जोडी म्हणून नावारुपास आलेल्या समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या नात्याला गालबोट लागलं. समंथा आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांच्या वैवाहिक नात्य़ाला संपवत काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली. ज्यानंतर समंथा आणि खुद्द नागा चैतन्य या दोघांनीही माध्यमांसमोर येणं टाळलं. घटस्फोटानंतर दोघेही त्यांच्या जीवनात पुढे गेले आहे. घटस्फोटानंतर समंथा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

आता देखील अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर समंथाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी समंथा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

Samantha Ruth

फोटोमध्ये समंथा लिंबू रंगाचा ट्रांसपेरेंट शर्टमध्ये दिसत आहे. समांथाने शर्टसोबत मस्त स्कर्ट पेअर केला आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी तिने मेकअप केला आहे. या बोल्ड लूकवर तिचे मोकळे केस ग्लॅमरस दिसत आहेत. 

घटस्फोटनंतर नागा चैतन्यचं अफेअर 
समंथा प्रभूला (Samantha Prabhu) घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालाला(Sobhita Dhulipalab) डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 

शोभिता धुलिपाला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. दरम्यान शोभिता नागासोबत त्यांच्या नवीन घरात दिसली होती. तेव्हापासून या दोन स्टार्सच्या अफेअरच्या बातम्यांना व चर्चांना ऊत आले आहे.