Samantha New House in Mumbai: समंथा झाली मुंबईकर! Sea View असणाऱ्या घराची किंमत थक्क करणारी

Samantha Bought New House in Mumbai: दाक्षिणात्य अभिनेत्रीचं हे मुंबईमधील पहिलं घर असून यापूर्वीच तिने तिच्या नवऱ्याचं घर घटस्फोटानंतर विकत घेतलं.

Updated: Feb 8, 2023, 03:56 PM IST
Samantha New House in Mumbai: समंथा झाली मुंबईकर! Sea View असणाऱ्या घराची किंमत थक्क करणारी title=
Samantha Bought New House in Mumbai

Samantha Bought New House in Mumbai: तेलगू अभिनेत्री समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या 'शाकुंतलम' (Shaakuntalam) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व्हिडीओ आणि फर्स्ट लूक रिलीज यापूर्वीच रिलीज झाला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. समंथाचे चाहते सध्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान आता समोर आलेल्या बातमीनुसार समंथाने मुंबईमध्ये नवं आलीशान घर (New House in Mumbai) खरेदी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदानानेही मुंबई घर घेतल्याची बातमी समोर आली होती.

मुंबईतील पहिली प्रॉपर्टी...

समंथाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन स्वत:चा एका फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सनसेट व्ह्यूबरोबर पोज देताना दिसत आहे. समंथाचा हा फोटोही चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा मुंबईमधील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काढण्यात आलेला नाही. तर हा फोटो मुंबईतील एखाद्या आलीशान इमारतीमधून काढण्यात आला आहे. त्यामुळेच समंथाने मुंबईमध्ये आलीशान घर विकत घेतलं आहे. हे खरं असेल तर समंथाची ही मुंबईतील पहिली प्रॉपर्टी ठरणार आहे.

किंमत थक्क करणारी...

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 'यशोदा' फेम अभिनेत्री समंथाने मुंबईमध्ये थ्री-बेडरुम फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटमधून समुद्राचा भन्नाट व्ह्यू दिसतो. त्याचबरोबर या फ्लॅटच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास हा फ्लॅट 15 कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या समंथा आपल्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये समंथा वरुण धवनबरोबर दिसणार आहे. काही बातम्यांनुसार केवळ या प्रोजेक्टसाठी ही दाक्षिणात्य अभिनेत्री मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. समंथाला भविष्यात बॉलिवूडमधील इतरही अनेक प्रोजेक्ट्सवर काम करण्याची इच्छा आहे.

यापूर्वी विकत घेतलंय नवऱ्याचं घर

समंथाने यापूर्वी मागील वर्षी आपल्या पूर्वश्रमीच्या पतीचं हैदराबादमधील घर विकत घेतलं होतं. समंथा आणि नाग चैतन्य लग्नानंतर ज्या घरात राहत होते तेच हे घर आहे. घटस्फोटानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे राहू लागले. त्यानंतर समंथाने हे घर विकत घेतलं. बऱ्याच आठवणी या घराशी जोडलेल्या असल्याने समंथाने हे घर विकत घेतल्याचं सांगितलं जातं. या घरासमाठी समंथाने कोट्यावधी रुपये मोजल्याचं समजतं.