Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय तर आहेत. त्यातच आता इन्स्टाग्रामवर अमृता फडणवीस यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्यांची नवीन स्टाईल पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीस यांचा नवा लूक काही नेटकऱ्यांना आवडला, तर काहींनी मात्र त्यांना ट्रोल केलं. मात्र यावेळी चर्चा रंगली ती जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांच्या कमेंटची...
वाचा: अक्षयसोबत लग्न मोडण्यावर रवीनानं उघड केलं कारण म्हणाली, 'इतकी वर्षे उलटली...'
'कोक स्टुडीओ भारत' या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गुलाबी रंगाचा टॉप आणि त्यावर कलरफूल पँट परिधान केले होते. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमातील फोटो शेअर केले. या फोटोत त्या खुप कुल आणि स्टायलिश दिसत आहेत. हे फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करताच नेटकऱ्यांचा कमेंटचा वर्षाव सुरु झाला.
'मॅडम, असे कपडे घालणे शोभत नाही तुम्हाला,, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांच्या अर्धागिनी आहात...', 'काय कपडे आहेत हे फॅशनच्या नावाखाली निट तरी करा फॅशन... जरा तरी शोभून दिसेल असे करा ...', 'फॅशन सेन्स खूप वाईट आहे.', अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्ट आल्या आहेत.
मात्र त्याच्या या पोस्टवर जॅकी श्रॉफ यांनी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. जॅकी श्रॉफ यांनी अमृता यांच्या या पोस्टवर टाळ्या वाजवल्याचा इमोजी वापरत कमेंट केली आहे. त्यांची ही कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.