हिमाचल विधानसभा निवडणुका : सलमान खान आणि कुटुंबियांंच्या घरीदेखील सेलिब्रेशन

Updated: Dec 18, 2017, 05:44 PM IST
हिमाचल विधानसभा निवडणुका : सलमान खान आणि कुटुंबियांंच्या घरीदेखील सेलिब्रेशन  title=

मुंबई : हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये आज विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले.

अनेक दिग्गाजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. अशांपैकी एक म्हणजे अनिल शर्मा... सलमान खानच्या घरीदेखील अनिल शर्माच्या विजयामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण अनिल शर्मा हे खान कुटुंबियांच्या शेंडेफळ  म्हणजे अर्पिता खान हिचे सासरे आहे.  

अनिल शर्मा विजयी  

कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन भाजपाचे सदस्यत्त्व स्वीकारले होते. 

अनिल शर्मा यांनी कॉंग्रेसमध्ये गुदमरल्यासारखे वाटत असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. हिमाचल प्रदेशातील मंडी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. 

वडिलांच्या अपमानाचा बदला 

राहुल गांधींच्या मंडीतील रॅलीमध्ये अनिल शर्मा यांच्या वडिलांना म्हणजेच पंडित सुखरामांच्या विरोध  करण्यात आला होता. निवडणुकांमध्येही  त्यांना तसेच त्यांच्या वडिलांना स्थान देण्यात आले नव्हते त्यामुळे कॉंग्रेसमधून शर्मा बाहेर पडले.  

आयुष सोबत अर्पिताचे लग्न 

१८ नोव्हेंबर  २०१४ साली आयुष आणि अर्पिता विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर दोघांचे लग्नाचे खास रिसेप्शन हिमाचल प्रदेशात झाले होते.