सर्वांसमोर सलमानचं अभिनेत्रीसोबत गैरवर्तन? ज्यामुळे चाहत्यांचा लाडका भाईजान होतोय ट्रोल

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा लाडका भाईजान होतोय ट्रोल... अभिनेत्रीसोबत डान्स करणं सलमानला पडलं महागात...  

Updated: Feb 27, 2022, 10:09 AM IST
सर्वांसमोर सलमानचं अभिनेत्रीसोबत गैरवर्तन? ज्यामुळे चाहत्यांचा लाडका भाईजान होतोय ट्रोल title=

मुंबई : कायम चाहत्यांच्या मनात राहणारा अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. सलमान सध्या अभिनेत्री पूजा हेगडे, दिशा पटानी, सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत 'दा-बँग द टूर - रीलोडेड' साठी दुबईत आहे. याचदरम्यान त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान पूजासोबत डान्स करतना दिसत आहे. 

डान्स करताना सलमान पूजाच्या ड्रेससोबत गैरवर्तन करताना दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. सलमान 'जुम्मे की रात' गाण्याची हुकस्टेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingkhantr)

व्हिडीओ सलमान पूडाचा ड्रेस तोंडाने पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो पूजाच्या मागे चालतो. पुढे तिला थांबायला सांगतो आणि 'जुम्मे की रात' गाण्याची स्टेप पुन्हा करतो.  

सलमान आणि पूजाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमा 2023 साली प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.