सलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?

हिंदी कलाविश्वातील 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान, त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेत असतो तितका, किंवा त्याहूनही जास्त चर्चा ही त्याच्या खासगी आयुष्यामुळं होत असते. सलमान हा एक उत्तम निर्माता, अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. सध्या त्याची एक पेंटिंग सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं पाहून याची प्रचितीसुद्धा येतेय. 

Updated: Jun 12, 2024, 04:00 PM IST
सलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work? title=

बॉलिवू़डचा 'दबंग खान' म्हणून ओखळला जाणारा सलमान हा कोणत्या ना कोणत्या कारणांनी कायमच चर्चेत असतो. तुम्हाला माहितीये का, अभिनयाच्या कारकिर्दीसमवेत तो व्यक्त होण्यासाठी कलेच्या आणखी एका माध्यमाचाही वापर करताना दिसतो. ते माध्यम म्हणजे, चित्रकला. सलमान त्याच्या चाहत्यांना नेहमी आश्चर्याचे धक्के देत असतो. अशा या अभिनेत्यानं नुकतंच एक पेटींग केलं असून त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनय आणि संगीतासोबतच सलमानला पेटींग काढायला ही तितकच आवडतं हे इथं चटकन लक्षात येतंय. त्याची ही कला पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.  

सलमानने याचा फोटो सोशलमी डियावर शेअर करत चित्राला 'युनिटी 1' असं नाव दिलं आहे. सलमानने काढलेलं हे पेंटींग 14 जून रोजी 'आर्ट टेक्नोलॉजी कंपनी' संस्थेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचं हे पहिलंवहिलं पेटींग असून सध्या अनेकांच्याच प्रशंसेस पात्रही ठरत आहे.  भाईजानचं हे पेंटींग तुम्हीही खरेदी करु इच्छित असाल, तर त्या संदर्भात माहिती त्यानंच सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

 

सलमानच्या पेंटींगविषयी 
युनिटी 1 असं त्याने काढलेल्या पेंटींगचं नाव आहे. युनिटी या सिरीजच्या माध्यमातून सलमान भारताच्या विविध संस्कृती पेटींगच्या माध्यंमातून दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे.  'आर्ट टेक्नोलॉजी कंपनी'चे सीईओ यांनी सांगीतल्यानुसार सलमानने काढलेल्या पेटींगला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चौकशी सुरु आहे. दरम्यान, सलमानच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालंच तर, 'सिकंदर'हा त्याचा नवा सिनेमा 2025 मध्ये चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भुमिकेत असणार आहे. एम आर मुरुगादास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एम आर मुरुगादास यांच्या बद्दल सांगायचं झालंच तर, याआधी त्यांनी 'गजनी' या सुपरहिट अ‍ॅक्शन सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रश्मिका आणि सलमान हे पहिल्यांदा पडद्यावर एकत्र येत असल्याने त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.