मलायका अरोराकडून बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि बेडरूममधील रहस्य उघड

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल, असलेली मलायका अरोराची सर्वत्र चर्चा सुरू असते.

Updated: Nov 3, 2021, 08:10 PM IST
मलायका अरोराकडून बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि बेडरूममधील रहस्य उघड title=

मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल, असलेली मलायका अरोराची सर्वत्र चर्चा सुरू असते. मलाईका आपल्या सोशल मीडियावरती देखील खूप अॅक्टीव्ह असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते, ज्याची चर्चा सर्वांमध्ये होत असते. परंतु अभिनेत्रीने एक असं वक्तव्य केलं आहे की, तिच्या शब्दांची सर्वत्र चर्चा होत आहे. तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बेडरूमबद्दल काही खुलासे केले आहेत!

त्याचबरोबर मलायका अरोराने असे अनेक खुलासे केले आहेत ज्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल.

एका शोमध्ये जेव्हा मलायका अरोराला विचारण्यात आले की, तिला कशी मुलं आवडतात? तेव्हा तिने उत्तर दिलं की, तिला दाढी असलेला मुलगा आवडतो. "माझ्या मते, ज्या लोकांना दाढी असते त्या मुलांची विनोदबुद्धी खूप चांगली असते!"

पुढे, मलायका अरोराला तिच्या बेडरूमबद्दल विचारले गेले, की, तिला बेडरुममध्ये काय करायला जास्त आवडते, तेव्हा तिने उत्तर दिले की, "मला झोपायला सगळ्यात जास्त आवडते."

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मोकळेपणाने फिरताना आणि आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात, परंतु लोकं त्याच्या जोडीला ट्रोल करतात. मलायका अरोरा ही एक मस्त आणि बेफिकीर अभिनेत्री आहे. त्यामुळे अशा सगळ्यांकडे दुर्लक्ष करणं तिला चांगलंच माहीत आहे. 

मलाईकाचा संबंध फिल्मी दुनियेशी असून देखील तिची इंस्टाग्रामसोबत चांगलं जमतं, ती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जास्त ऍक्टिव्ह असते. ती तिच्या सोशल मीडियावर तिचे योग आणि फिटनेस व्हिडीओ देखील शेअर करत असते!

ही पहिली वेळ नाही जेव्हा एखाद्या अभिनेत्रीने बेडरूमच्या सीक्रेटवर आपले विचार शेअर केले आहेत, याआधी करीना कपूर खानने देखील असे केले आहे.