सलमान खानकडून कपिल शर्माला मोठी मदत

नेमकं काय करणार? 

सलमान खानकडून कपिल शर्माला मोठी मदत  title=

मुंबई : कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर पुन्हा येण्यावरून चर्चेत आहे. पण कपिल आता पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री करणार आहे. तसेच अशी देखील चर्चा आहे की, कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नीसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. आता कपिल शर्माच्या बाबतीत एक मोठी रिपोर्ट आली आहे. 

कपिलच्या कॉमेडी शो ला आता सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस प्रोड्युस करणार आहे. पुढच्या महिन्यात 16 डिसेंबर रोजी कपिल शर्मा शुटिंग सुरू करणार आहे. आतापर्यंत कपिल शर्मा आपल्या स्वतःचे शो स्वतः प्रोड्यूस करत असे. मात्र फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा या शोची प्रोडकश्नची जबाबदारी चॅनलने कुणा दुसऱ्याला दिली आहे. 

कपिलच्या शो करता फिल्म सिटीच्या आठव्या माळ्यावर सेट देखील तयार केला जात आहे. याच जागेवर कपिलने जुने सिझ केले आहे. 12 डिसेंबर कपिल शर्मा जालंधरमध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न करणार आहे. 14 डिसेंबरला रिसेप्शन पार्टी असणार आहे.