सलमानचा आणखी सेलिब्रिटींशी पंगा; या मेगा स्टारसोबत मिळवला हात

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे देशभरात प्रचंड चाहते आहेत.

Updated: Aug 13, 2021, 08:19 PM IST
 सलमानचा आणखी सेलिब्रिटींशी पंगा; या मेगा स्टारसोबत मिळवला हात title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे देशभरात प्रचंड चाहते आहेत. सलमान खानचा एखाद्या चित्रपटाशी संबंध हा स्वतःच त्या चित्रपटाच्या यशाची गॅरंटी मानली जाते. हेच कारण आहे की, बऱ्याचदा मोठे स्टार्स देखील त्यांच्या चित्रपटासाठी सलमान खानला अप्रोच साधण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बॉलिवूडचा सुपरस्टार स्वतःसुद्धा आपल्या मित्रांची आणि जवळच्या स्टार्सची ही इच्छा पूर्ण करण्यास मागे हटत नाहीत आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे.

अलीकडेच सुपरस्टार सलमान खानबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. सलमान खान साऊथचा मेगा स्टार चिरंजीवीचा आगामी चित्रपट गॉडफादरमध्ये दिसू शकतो. टॉलीवुड सुपरस्टार चिरंजीवीने सलमान खानला त्याच्या चित्रपटासाठी संपर्क बोललं जात आहे. ज्यामध्ये तो कॅमिओ करताना दिसणार आहे. असं झाल्यास सलमान खानचा हा सिनेमा पहिला दक्षिणात्य चित्रपट असेल. मात्र, या अहवालांमध्ये किती सत्यता आहे हे जाणून आपल्याला अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र जर सलमान खरंच टॉलीवुड सिनेमात दिसला तर टॉलिवूडच्या अनेक स्टार्ससोबत तो पंगा घेईल ईतकं नक्की. या सगळ्यामध्ये तो किती यशस्वी ठरेल हे पाहणं देखील औत्सु्क्याचं ठरेल

तसं, सलमान खानच्या टॉलीवूड पदार्पणाची चर्चा सुरू होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी असंही म्हटलं जात होतं की, सलमान खान चिरंजीवीच्या आचार्य चित्रपटात एक छोटासा रोल साकारताना दिसणार आहे. मात्र असं काहीच झालं नाही. याआधी सलमान खानचं नाव रोबोट फेम दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी चित्रपटाशीही जोडलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा सलमान खानच्या पदार्पणाबाबत चर्चा होताना दिसत आहेत.

सलमान खान दक्षिणात्य सिनेमांच्या चित्रपटांचा मोठा चाहता आहे. हेच कारण आहे की, सलमानने अनेक सुपरहिट दक्षिणात्य चित्रपटांचे ब्लॉकबस्टर हिंदी रिमेक केले आहेत. सलमान खान ब्लॉकबस्टर तामिळ चित्रपट मास्टरचा हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे.