'लवरात्री' साठी सलमान खानने केली 'वरिना'ची निवड

काही तासांपूर्वी सलमान खानने केलेल्या ट्विटने सोशल मीडियामध्ये आणि सलमान खानच्या चाहत्यांमध्ये अनेक चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. 

Updated: Feb 7, 2018, 04:51 PM IST
'लवरात्री' साठी सलमान खानने केली 'वरिना'ची निवड title=

मुंबई : काही तासांपूर्वी सलमान खानने केलेल्या ट्विटने सोशल मीडियामध्ये आणि सलमान खानच्या चाहत्यांमध्ये अनेक चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. 

सलमानचे ट्विट काय ? 

'मुझे लडकी मिल गयी' इतकेच ट्विट सलमान खानने काही तासांपूर्वी केले होते. मात्र ही मुलगी नेमकी कोण? कशासाठी ? सलमान खान लग्न करतोय अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही वेळातच सलमान खानने शोधलेली मुलागी ही त्याच्यासाठी नसून सलमान खानचा भावोजी म्हणजेच आयुष शर्मासाठी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.  

 

वरिना आणि आयुष एकत्र झळकणार  

वरिना  हुसेन  ही आयुष शर्मासोबत आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. वरिनाचा फोटो आणि ही माहिती सलमान खानच्या अकाऊंटवरून देण्यात आली आहे.  

 

लवरात्री आगामी चित्रपट 

आयुष शर्माचे कुटुंबीय हे राजकारणात सक्रिय आहेत. मात्र आयुष शर्माला सिनेसृष्टीमध्ये संधी देण्यासाठी सलमान खान पुढे आला आहे. लवरात्री या आगामी चित्रपटातून आयुष हिंदी सिनेमात पदार्पण करणार आहे. 

अभिराज मीनावाला लवरात्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी अभिराजने 'सुल्तान' आणि 'फॅन' चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम केले आहे.