सलमान खान 'या' तरूणाला करणार लाँच

अनेक स्टार किड्सला बॉलिवूड इंडस्ट्रीत दबंग सलमान खानने लाँच केलं आहे. एवढंच काय तर आपल्या फॅमेली मेंबर्सला देखील सलमान खानने लाँच केलं आहे. सलमान खान कायमच नव्या टँलेटला बॉलिवूडमध्ये प्लॅटफॉर्म मिळवून देत असतो.

सलमान खान 'या' तरूणाला करणार लाँच  title=

मुंबई : अनेक स्टार किड्सला बॉलिवूड इंडस्ट्रीत दबंग सलमान खानने लाँच केलं आहे. एवढंच काय तर आपल्या फॅमेली मेंबर्सला देखील सलमान खानने लाँच केलं आहे. सलमान खान कायमच नव्या टँलेटला बॉलिवूडमध्ये प्लॅटफॉर्म मिळवून देत असतो.

आदित्या पंचोलीच्या मुलाला सुरज पंचोलीला आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला बॉलिवूडमध्ये सलमान खानने लाँच केलं आहे. तसेच अर्पिताचा नवरा आयुष शर्मालाही त्यानेच लाँच केलं. आता सलमान आणखी एका स्टारला लाँच करणार आहे. आणि याची कबुली त्याने स्वतःच एक फोटो शेअर करून दिली आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने एका लहान मुलाला कडेवर घेतले आहे. या फोटोवर त्याने कॅप्शन लिहिली आहे की, उद्या लाँच होणार. उद्या बघुया हा मुलगा आता कसा दिसतो. 

कोण आहे हा मुलगा?

या मुलाचा नावं आहे जहीर इकबाल. जहीर रतनसी या नावाने ओळखला जातो. जहीरबाबत याहून अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही. पण तो एका प्रसिद्ध ज्वेलर्सचा मुलगा आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वी जहीरसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने सलमान आपला सुरक्षा कवच असल्याचं म्हटलं आहे.