लॉकडाऊन : सलमानने Being Haangryy नावाने सुरू केला फूड ट्रक

शेकडो मैलांचा प्रवास करणाऱ्या मजुरांना मदतीचा हात 

Updated: May 8, 2020, 03:52 PM IST
लॉकडाऊन : सलमानने Being Haangryy नावाने सुरू केला फूड ट्रक  title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनच्या काळात हजारोंच्या संख्येत मजुर पायी अनेक किमीचा प्रवास करत आहेत. अशा मजुरांसाठी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान धावून आला आहे. सलमान खान Being Human या संस्थेमार्फत अनेक समाजसेवा करतच असतो. पण आता जागतिक साथीच्या रोगाच्या काळात सलमानने Being Hungaryy नावाचा एक ट्रक सुरू केला आहे. 

सोशल मीडियावर सलमान खानच्या एका चाहत्यान ही माहिती ट्विट करून दिली आहे. या ट्विटमध्ये मजुरांसाठी रेशन देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी त्याच भरपूर कौतुक केलं आहे. मात्र सलमान खानकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. 

शिवसेनेचे युवानेता राहुल कनाल यांची फूड व्हॅनचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने या ट्विटमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत. धन्यवाद, सलमान भाई अगदी शांतपणे असं काही केल्याबद्दल.सलमानच्या अधिकृत अकाऊंटवरून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.