मॉलमध्ये एकटा फिरताना दिसला सलमान खान

का आली सलमानवर अशी वेळ 

मॉलमध्ये एकटा फिरताना दिसला सलमान खान  title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या फॅन फॉलोइंगबद्दल आपल्याला माहितच आहे. सलमान खानची एक नजर दिसावी म्हणून त्याच्या घराबाहेर हजारो प्रेक्षक रोज गर्दी करतात. भाईजानची ही क्रेझ फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील प्रेक्षक त्याच्यासाठी क्रेझी आहेत. सलमान कुठेही गेला तरी त्याला चाहते घेरतात आणि फोटो काढण्यासाठी आतुर असतात. असं असताना मात्र सलमान खान एकटा एका मॉलमध्ये दिसला आहे. 

सलमान खानसोबत कायम त्याचा बॉडीगार्ड शेरा आणि टीममधील इतर मंडळी दिसतात. मात्र आताच्या या व्हिडिओत सलमान खान एकटा दिसत आहे. भाईजान दुबईच्या एका मॉलमध्ये शॉपच्या बाहेर एकटाच बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

ब्लॅक टी-शर्ट, डेनिमसोबत त्याने कॅप घातली आहे. बॅंचवर बसलेल्या सलमान खानसोबत कुणीच दिसत नाही. आपल्या मोबाईलवर बिझी असलेला सलमान अतिशय शांत दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सलमान खान एका मॉलमध्ये असून देखील त्याच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी नाही.