'भाईजान'च्या बहिणीचा सुपर रोमँटिक अंदाज, सोशल मीडियावर फोटोनं घातला धुमाकूळ

सल्लूभाईच्या बहिणीचा रोमँटिक अंदाज, सोशल मीडियावर फोटोनं धुमाकूळ

Updated: Mar 27, 2021, 09:19 PM IST
'भाईजान'च्या बहिणीचा सुपर रोमँटिक अंदाज, सोशल मीडियावर फोटोनं घातला धुमाकूळ title=

मुंबई: सेलिब्रिटीसचे फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण यावेळी एका बड्या सेलेब्रिटीच्या बहिणीच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर likes आणि comments चा पाऊस पाडला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खान सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अर्पिताचा पती आयुष शर्माने त्याच्या सोशल मिडीयावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आयुष आणि अर्पिता रोमेटीक पोझ दिली आहे.

काही दिवसांपूर्वी आयुषने  एका पोस्टमध्ये अर्पिताची दोन छायाचित्रे शेअर केली होती ज्याला 'लव्ह' असे कॅप्शन दिले होते. आता आयुषने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे,या फोटोत आयुष आणि अर्पिता एकमेकांच्या डोळ्यात बघतांना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

अभिनेता आयुष शर्माने लव्हयात्री या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. आता लवकरच आयुष 'अंतिम' या चित्रपटात दिसणार आहे. आयुषने या चित्रपटात त्याच्या लूकसाठी जिममध्ये खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात आयुषसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमान एक शीख पोलीस अधिकारी म्हणून दिसणार आहे, जो आपल्या कार्यक्षेत्रात गँग वॉर आणि लॅन्ड माफिया संपविण्याच्या मिशनवर आहे, याचा टीझर काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि  जावई अभिनेता आयुष शर्मा कायमच सोशल मिडीयावर अॅक्टाव्ह असतात. सोशल मीडियावर या दोघांचेही 1million पेक्षा अधिक followers आहेत.  हे कपल   त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून देताना दिसतात.