Salman Khan : वय हा केवळ आकडा... 57 वर्षीही पिळदार शरीर, शर्टलेस फोटोवर तरुणींच्या कमेंट्स

Salman Khan Shirtless Photo Viral : सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत सलमान शर्टलेस असून त्याची टोन्ड बॉडी आणि अॅब्स पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट देखील केल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 6, 2023, 06:27 PM IST
Salman Khan : वय हा केवळ आकडा... 57 वर्षीही पिळदार शरीर, शर्टलेस फोटोवर तरुणींच्या कमेंट्स title=
(Photo Credit : Salman Khan Instagram)

Salman Khan Shirtless Photo Viral : बॉलिवूडचा भाईजान आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. सलमान हा आज 57 वर्षांचा असला तरी सुद्धा तो त्याच्या फिटनेसकडे लक्ष ठेवून असतो. सलमान त्याचे वर्क आऊटचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. सलमान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला दिसते. सोशल मीडियावर सलमान वर्क आऊट आणि त्याच्या फिटनेसचे अनेक फोटो शेअर करतो. दरम्यान, नुकताच सलमाननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Salman Khan Shirtless) 

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सलमान या फोटोत शर्टलेस असल्याचे दिसत आहे. फोटोत सलमान एका खिडकीजवळ बसला असून डोळे बंद करून बसला आहे. हा फोटो शेअर करत 'मी शांत बसून आनंद घेत आहे असं दिसत असलं तरी असं नाही आहे.' असं कॅप्शन सलमाननं दिलं आहे. मात्र, या फोटोमध्ये सगळं लक्ष हे सलमानच्या अॅब्सवर जात आहे. फोटोतील लाइट देखील ही सलमानच्या अॅब्सवर येत आहे. सलमानच्या या फोटोवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. (Salman Khan Viral Photo) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'काय फीटनेस आहे राव.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हेटर्स बोलतील हा एडिटेड फोटो आहे. भाईजानसाठी वय ही फक्त एक संख्या आहे.' तर काही नेटकऱ्यांनी सलमानला या फोटोवरून ट्रोल देखील केले आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सलमान सर विचार करत असतील की आता लग्न करायला हवं... दुसऱ्या कलाकारांच्या मुलांची मुलं मला आजोबा बोलायला नको.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सलमान भाई विचार करत असेल गर्लफ्रेंड तर नाही जिला मी 6 पॅक अॅब्स दाखवेन मग सोशल मीडियावर शेअरच करतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हवा भरलीस काय?' 

हेही वाचा : Youtuber Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

सलमानच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर सलमान लवकरच  ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)  या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. तर दिवाळीत सलमानचा ‘टाइगर-3’ (Tiger 3) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमानकडे 'किक 2' (Kick 2) हा चित्रपट देखील आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x