Salman Khan 'हे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर VIDEOची चर्चा

सलमान खानची अशीच एक कृती पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 4, 2022, 05:41 PM IST
Salman Khan 'हे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर VIDEOची चर्चा title=
salman khan seen hiding glass in the pocket of jeans video viral on social media

Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार आणि मोठ्या चाहत्या वर्ग असणारा सलमान खान सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. त्याचा सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोवर आहेत. सलमान खान काहीही करेल त्याची बातमी होते. सल्लूमियाच्या प्रत्येक घडामोडीवर कॅमेऱ्याची नजर असते. 

सलमान खानची अशीच एक कृती पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही सलमान खान त्याच्या कारमधून खाली उतरतो आणि त्याच्या जीन्सच्या खिशात पाण्याचा ग्लास ठेवतो, जो त्याने हातात धरला होता. या व्हिडीओमध्ये सल्लूची शैली आणि त्याचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. अभिनेत्याने ज्या पद्धतीने पाण्याचा ग्लास खिशात ठेवला आहे ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. (salman khan seen hiding glass in the pocket of jeans video viral on social media)

मुराद खेतानी हा बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आहे. मुराद खेतानीने नुकतीच त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड तारे उपस्थित होते. हा व्हिडीओ खेतानी यांच्या बर्थडे पार्टीचा असल्याचं समजतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

हा व्हिडिओ Woopla च्या अधिकृत इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "बंदुकीसाठी परवाना घेतला होता, भाऊ पाण्याचा ग्लास घेऊन चालत आहे". तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "भाई तो फुल ट्यून है".