हातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप

Salman Khan वर Ex- Girlfriend सोमी अलीचे खळबळजनक आरोप..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल शोधण्यापासून तिच्यावर केलेल्या हिंसाचारा पर्यंत अनेक गोष्टींविषयी तिनं स्पष्टपणे सांगितले आहे. 

Updated: Jan 7, 2023, 11:03 AM IST
हातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप title=

Somy Ali On Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली (Somi Ali) एकेकाळी भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. सोमी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेच असते. सोमीनं अलीकडेच काही पोस्ट शेअर करत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. सोमीनं पुन्हा एकदा डिसेंबर 2022 मध्ये एक पोस्ट शेअर करत सलमानवर आरोप केले होते की अभिनेत्यानं तिचे फक्त शोषण केले नाही तर सिगारेटचे चटके देखील द्यायचा. 

सोमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत 'नो मोअर टीयर्स' या तिच्या एनजीओविषयी बोलते. पुढे तिनं मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराच्या बळींसाठी हा एनजीओ सुरू केल्याचे सांगितले आहे. पीडितांना वाचवण्यासाठी तिनं 15 वर्षे मेहनत करत हे उभारले आहे. तिचं हे काय डॉक्युमेंट्री सीरिज म्हणून दाखवणार आहे. यानंतर सोमीनं सांगितलं की नो मोर टियर्सची सुरुवात तिनं कशा प्रकारे केली. कारण लहानपणी ती लैंगिक हिंसाचाराला बळी पडली होती. वयाच्या 5 व्या वर्षी तिचे शारीरिक शोषण झाले होते. तर त्यानंतर 9 व्या वर्षी पाकिस्तानमध्ये असलेल्या तिच्या हाऊस हेल्परनं तिचं शोषण केलं. 14 वर्षांची असताना अमेरिकेत तिच्यावर बलात्कार झाला. यानंतर ती भारतात आली आणि ज्या व्यक्तीसोबत 8 वर्षे ती रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याकाळात त्यानं तिच्यावर घरगुती हिंसाचारही केला, असं सोमी अलीनं म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सोमी अली म्हणाली, तिचा भारतात येण्याचा खरा उद्देश सलमान खानशी लग्न करणे होता. त्यावेळी सोमी 16 वर्षांची मुलगी होते. तर तिचे मन बालिश होते. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यानं तिच्या आयुष्यात साकारलेली व्यक्तिरेखा इतकी वेगळी असेल, याची मला कल्पना नव्हती. तो मला मारहान करायचा बऱ्याचवेळी माझी मोलकरीन माझ्या बेडरुमचा दरवाजा जोर जोरात ठोकायची आणि बोलायची की कृपया मॅडमला मारहान करू नका, कारण मला झालेला त्रास ती पाहू शकत नव्हती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोमीनं आणखी एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले आहे. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल फोडली असती तर मी रुग्णालयात असते. त्यानं माझ्या डोक्यावर थंप्सअप असलेला ग्लास ओतला होता, ज्यात रम होती आणि ती पहिली वेळ होती जेव्हा मी मद्यपानाचे सेवन करणार होती. त्यावेळी तेथे अभिनेता मित्र देखील उपस्थित होता. त्यानं हे सर्व पाहिलं होतं. मी त्याचा आदर करते म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही. पण सलमाननं डोक्यावर बॉटल फोडली असती तर मी आयसीयूमध्ये असते.