मुंबई : अभिनेत सलमान खान आणि त्याचे प्रेम प्रकरण कायम चर्चेत असणारा विषय आहे. कोणत्याही कार्यक्रमात, मुलाखती दरम्यान सलमानला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं जात. सलमान अशा प्रश्नांची उत्तरं देखील तितक्याचं संयमाने देतो. सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असेलेला व्हिडीओ अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर स्टारर 'ओके जानू' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. यावेळी श्रद्धा सलमानला त्याच्या लव लाईफबद्दल एक प्रश्न विचारते.
श्रद्धा सलमानला विचारते 'वर्ल्ड कपची महत्त्वाची मॅच असेल आणि तुझ्या गर्लफ्रेंडला मॅच न पाहाता बाहेर तुझ्यासोबत फिरायला जायचं असेल तर तु काय करशील?' प्रश्नावर सलमानचं उत्तर ऐकून उपस्थित सर्व जण हासू लागले.
सलमान म्हणाला, 'असं असेल तर मी तिला सोडून देईल. वर्ल्ड कपची महत्त्वाची मॅच आहे आणि ती मला समजून घेणार नसेल. तर पुढे मोठ्या अडचणींमध्ये ती कसं समजून घेईल... '
सलमानने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकताचं आदित्य देखील हासू लागला. सलमान, श्रद्धा आणि आदित्यचा हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.