अखेर ती वेळ आलीच ! Salman Khan आनंदाची बातमी देत म्हणाला, मी सिंगल नाही तर...'

भाईजान सलमान खानच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. 

Updated: Jan 30, 2022, 02:28 PM IST
 अखेर ती वेळ आलीच !  Salman Khan आनंदाची बातमी देत म्हणाला, मी सिंगल नाही तर...' title=

मुंबई : भाईजान सलमान खानच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. सलमान खानने लग्न करावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान स्वतःला सिंगल म्हणवतो. पण आता त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे, जे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याचा खुलासा केला आहे. बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल या शोमध्ये येणार आहे जिच्यासोबत सलमान स्टेजवर मजामस्ती करताना दिसणार आहे.

तर शहनाज देखील सलमानची गुपित उघड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर अखेर आता भाईजान आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सर्वांना सांगणार आहे.

या शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शहनाज गिल कतरिना कैफचे नाव घेऊन सलमान खानला चिडवताना दिसत आहे. शहनाज व्हिडिओमध्ये म्हणते की मी पंजाबच्या कतरिना कैफपासून भारताची शहनाज गिल बनले आहे कारण भारताची कतरिना कैफ पंजाबची कतरिना झाली आहे.

शहनाजचे म्हणणे ऐकल्यानंतर सलमान खान म्हणतो की, हे बरोबर आहे. सगळे खूश आहेत. यावर शहनाज सलमानला म्हणते की सर तुम्ही खुश राहा.

यानंतर ती म्हणते की सॉरी मी जास्त बोलले नाही ना. यानंतर शहनाज म्हणते की सिंगल्स अधिक चांगले दिसतात. यावर सलमान म्हणतो की हे चांगले आहे, झालो कर चांगल आहे.

यानंतर शहनाज सलमानला विचारते, मग रिलेशनशीपमध्ये आहात का? यावर सलमान खान हो म्हणतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

नॅशनल टीव्हीवर सलमान खानने त्याच्या रिलेशशीप बदद्ल खुलासा केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. आता सलमान कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे अद्याप समोर आलेले नाही.