'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच

Salman Khan on Gadar 2: सध्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट विशेष गाजतो आहे. यावेळी सलमान खाननं सनी देओलला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 12, 2023, 03:28 PM IST
'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच  title=
August 12, 2023 | salman khan reacts on sunny deol gadar 2 post goes viral

Salman Khan on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घातलो आहे.पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चक्क 40 हून अधिक कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या OMG 2 पेक्षा Gadar 2 बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे सनी देओलच्या गदरनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यावेळी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज या चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थिती दाखवली होती. सोबत अनेकांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहे. सनी देओलची बहीण ईशा देओल हिनं सनी देओलला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत नुकताच नाना पाटेकर यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातून आता सुपरस्टार अभिनेता सलमान खाननंही आपल्या लाडक्या कलाकार मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की सलमान खाननं यावेळी आपल्या पोस्टमध्ये सनी देओलच्या या आगामी चित्रपटासाठी नक्की काय म्हणलं आहे? 

2001 साली सनी देओलचा 'गदर - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होता. हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाची तरुणाईलाही भुरळ लागून राहिली होती. गदरच्या पहिल्या भागाची गाणीही फारच गाजली होती. त्या चित्रपटातून सनी देओल आणि अमीषा पटेल यांची आगाळीवेगळी कमेस्ट्री प्रेक्षकांसमोर आली होती. त्यामुळे त्यांच्या या केमेस्ट्रीचीही चांगलीच चर्चा होती. आता हीच जोडी नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 22 वर्षांनंतर गदरची पुढची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेळी या चित्रपटानं सगळीकडे धुमाकूळ घातला असून अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाला मागे टाकलं आहे. त्यामुळे सनी देओलच्या पाजीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. दोन्ही चित्रपटांना समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

हेही वाचा - 'आता खरी मजा येणार,' सनी देओल आणि नाना पाटेकर एकत्र दिसल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्साह; Video Viral

यावेळी सलमान खाननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''ढाई किलो का हात म्हणजे चालीस करोड की ओपनिंग. सनी पाजी इज किलिंग इट. गदर 2 च्या संपुर्ण टीमचे अभिनंदन''. यावेळी सलमान खाननं सनी देओलचे कौतुक केले आहे. यावेळी सलमानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी नानाविध कमेट्सही केल्या आहेत. एका युझरनं म्हटलंय की, 'ब्रदरहुड'. तर दुसऱ्यानं म्हटलंय की, 'भाई'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी अनेकांची उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे 'टायगर 3' या सिनेमाची. सलमान खान आणि कतरिना कैफ यावेळी एका भुमिकेतून दिसणार आहेत.