मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधली एक ब्लॉकबस्टर जोडी आहे. या जोडीचा रूपेरी पडद्यावरील जलवा पाहण्यासाठी त्यांचे आतुर असतात. मात्र नुकतेच त्यांनी रॅम्पवॉकवरही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनीष मल्होत्राच्या एका खास फॅशन शोमध्ये सलमान खान आणि कॅटरिना शो स्टॉपर होते.
मनीष मल्होत्राच्या 'लेबल इलस्ट्रस ' डिझाईनला 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने खास शोचं आयोजन केलं होते. मुंबईच्या जे डब्यू मॅरिएटमध्ये हा सोहळा पार पडला. सलमान खान काळ्या रंगाचया शेरवानीमध्ये तर त्याच्या साजेशा न्यूड रंगाच्या खास लेहंगा चोलीमध्ये कॅटरिना रॅम्पवर उतरली होती.
रॅम्पवॉक झाल्यानंतर काही वेळाने सलमान खान घामाने भिजत होता. सुरूवातीला सलमानने शेरवानीच्या बाह्याने कपाळावरच घाम पुसला. मात्र कार्यक्रमादरम्यान फोटोसेशन आणि इतर मान्यवर मंचावर येईपर्यंत त्याला उकाडा असह्य झाल्याने त्याने शेरवानीचं जॅकेट मंचावरच काढले.
सलमानचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
भारत या अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटात सलमान खानच्या सोबत देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र अचानक प्रियांकाने या सिनेमातून एक्झिट घेतल्याने त्याजागी कॅटरिना कैफची वर्णी लागली आहे. लवकरच कॅटरिना या सिनेमाच्या शूटींगला सुरूवात करणार आहे.
यंदा अली, सलमान आणि कॅटरिना या ट्रायोने 'टायगर झिंदा है' हा सुपर ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आहे. त्यामुळे पुढील ईदला 'भारत'मध्येही हा ट्रायो दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.