मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान शूटिंगदरम्यान आपल्या सहकलाकारांची विशेष काळजी घेतो. 'टायगर जिंदा है' चित्रपटात सहकलाकार असलेल्या सरताज कक्करसोबतही त्याने असेच काहीसे केले. सरताजच्या खाण्यापिण्याची तो विशेष काळजी घेत असे. त्याच्यासाठीही तो त्याच्या खास शेफकडून शिजवलेले अन्न मिळवत असे. 'टायगर जिंदा है' चित्रपटात सरताजने सलमान खान आणि कतरिना कैफच्या मुलाची भूमिका साकारली होती.
सरताज कक्करने 'टायगर जिंदा है'मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. सरताजने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'शूटच्या शेवटच्या दिवशी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्वजण डान्स करत होते. हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव होता.
जेव्हा आम्ही ऑस्ट्रियामध्ये शूटिंग करत होतो तेव्हा आम्हाला तिथे खायला भारतीय पदार्थ मिळत नव्हते. एकदा सलमान सरांनी मला विचारले की मी काय खाल्ले? मी सांगितले की मी हे खाल्ले आहे. त्याने विचारले- भारतीय जेवण सापडले नाही ना? मी म्हणालो- सापडले नाही.
सरताज कक्करने सांगितले की, त्याने लांडग्यांशी लढण्याचे प्रशिक्षण घेतले होते. हा चित्रपटातील एक प्रसिद्ध सीन होता. तो म्हणाला, 'आपल्याला लांडग्यांसोबत शुटींग करायचं आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. मला आधी वाटले की, कुत्रे लांडग्यांसारखे दिसले म्हणून त्यांचा वापर केला जाईल पण नंतर असे दिसून आले की शूटिंगमध्ये खरे लांडगे वापरले जातील. त्याची उंची जवळपास आपल्या सारखीच आहे. ऍक्शन सीन दरम्यान काही लांडगे शांत होते तर काही हिंसक होते.
'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुंदर ठिकाणी करण्यात आले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ जबरदस्त ऍक्शन सीन्स करताना दिसले होते. हा चित्रपट 'एक था टायगर'चा सिक्वेल होता.