Salman Khan V/s Anil Kapoor: बिग बॉसच्या होस्टमध्ये नंबर 1 कोण?

बिग बॉसचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे. सध्या बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग अनिल कपूर करत आहे. तर याआधी बिग बॉसचे होस्टिंग सलमान खानने केलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 1, 2024, 05:25 PM IST
Salman Khan V/s Anil Kapoor: बिग बॉसच्या होस्टमध्ये नंबर 1 कोण?  title=

Bigg Boss : बिग बॉस दरवर्षी नवीन सीझन आणि नवीन स्पर्धक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान हा या वादग्रस्त 'रिअॅलिटी शो'चे होस्ट करत आहे. मात्र, 'बिग बॉस शो'ला सलमानने ज्या पद्धतीने होस्ट केलं ते आतापर्यंत कोणीही करु शकलेले  नाही. त्यामुळे जेव्हा होस्टिंगचा विचार केला जातो. तेव्हा सलमानशिवाय इतर कोणाचेही नाव निर्मात्यांच्या मनात येत नाही. त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षक सलमान खानचा चेहरा पाहण्यासाठी आकांक्षा बाळगत असतात. 

यापूर्वी हा शो फक्त छोट्या पडद्यावर यायचा, पण डिजिटल जगाशी ताळमेळ राखण्यासाठी निर्मात्यांनी आता तो OTT वरही सुरू केला आहे. बिग बॉस OTT 3 चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्ट रोजी आहे. पूर्ण महिना उलटला, पण प्रेक्षकांना अनिल कपूरचं होस्टिंग फारसं आवडलं नाही.
सलमान खानच्या आधीच्या गोष्टी सोडा, सलमान खान नंतर जे या शोचे होस्ट झाले तेही काही खास करू शकले नाहीत. मग तो संजय दत्त असो, करण जोहर असो, फराह खान असो किंवा आता अनिल कपूर असो. 

बिग बॉस OTT 3 ला किती क्रेझ?

बिग बॉस OTT 3 च्या सुरुवातीपासूनच चाहते सलमान खानला मागणी करत आहेत. अनिल कपूरची तुलना सलमान खानसोबत सातत्याने केली जात आहे. सुपरस्टारने आत्तापर्यंत अनेक सीझन होस्ट केले आहेत. बिग बॉसचा 13वा सीझन सर्वात हिट ठरला आहे. जरी इतर अनेक सीझन आहेत ज्यात सलमानने प्रचंड टीआरपी दिला आहे. परंतु बिग बॉस OTT वर थंड दिसत आहे. बिग बॉस OTT चा तिसरा सीझन सर्वात कमी पाहिला जाणारा सीझन ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनिल कपूर की सलमान खान? 

अभिनेता सलमान खानची बिग बॉसची होस्टिंगची शैली खास आहे. जेव्हा सलमान बिग बॉसचे होस्टिंग करतो, तेव्हा प्रत्येकजण वीकेंड वारची वाट पाहत असतो. शनिवार आणि रविवारचा टीआरपी सलमान खानमुळे खूप वाढतो. कदाचित त्यामुळेच सलमान खानला हा शो होस्ट करण्यासाठी चांगली किंमत मिळाली आहे.