Durgesh Kumar Buys House In Mumbai : 'पंचायत' या सीरिजचे लाखो चाहते आहेत. या सीरिजमधून लोकप्रियता मिळवलेल्या दुर्गेश कुमारनं मुंबईत त्याचं स्वत: चं हक्काच घर खरेदी केलं आहे. अखेर तो मुंबईकर झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर घराच्या चावीचा फोटो शेअर केला आहे. दुर्गेशनं त्याचा हा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'बनराकस' ही भूमिका साकारत दुर्गेशनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. जवळपास एक दशक मुंबईत स्ट्रगल केल्यानंतर अखेर त्यानं स्वत: चं हक्काच घर खरेदी केलं आहे. त्यानिमित्तानं त्यानं सांगितलं की कशा प्रकारे तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर त्यां हे सगळं केलं.
दुर्गेश कुमारनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यानं त्याच्या घराच्या चावीचा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की 'माझं मुंबईतलं घर... बाबूजी हरे कृष्णा चौधरी तुमच्या आशीर्वादासाठी धन्यवाद.' दुर्गेशनं त्याच्या घराविषयी जास्त माहिती दिली नसून इतकंच सांगितलं आहे.
दरम्यान, दुर्गेशनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी 'पंचायत' या सीरिजचे डायलॉग्स कमेंटमध्ये शेअर केले आहेत. त्याचं कारण म्हणजे 'पंचायत' सीरिजमध्ये पश्चिम फुलेरामध्ये घरावरून खूप वाद झाला होता. अशात एका चाहत्यानं कमेंट करत सांगितलं की 'पश्चिम फुलेराला आणखी एक घर.' दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'अम्मी जी को मिलना था... इसने ले लिया। देख रहा है बिनोद। ये घपला चल रहा है।.' त्यासोबत त्या नेटकऱ्यानं दुर्गेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
'पंचायत' सीरिजचा तिसरा सीझन हा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या वेब शोमध्ये दुर्गेश कुमारनं भूषण ही भूमिका साकारली होती. त्याला या मालिकेत बनराकस हे टोपन नावं दिलं होतं. दुर्गेशला संपूर्ण गाव हे बनराकस या नावानं ओळखतात. दरम्यान, दुर्गेशनं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की पैशांच्या कमतरतेमुळे त्यानं 'वर्जिन भास्कर' मध्ये काम केलं.
हेही वाचा : राज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
दुर्गेश गेल्या काही दिवसापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'महाराज' या चित्रपटात देखील दिसला. पण चित्रपटातील त्याचे सीन एडिट केले. याच चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैदनं देखील या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.